• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विविध मागण्यांसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे ९ ऑगस्टला आमरण उपोषण

ByEditor

Aug 3, 2024

घन:श्याम कडू
उरण :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, नगरविकास विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य नगरपरीषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक यांच्या समक्ष घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी दिड वर्ष झाला तरी होत नाही. त्याच्या निषेधार्थ येत्या ९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

गेली अनेक महिने आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी आजतागायत करण्यात आलेली नाही. त्याविरोधात कर्मचारी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याची सुरुवात ६ ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन तर ७ ऑगस्ट रोजी बेलापूर ते मंत्रालय लॉंगमार्च आंदोलन, त्यात अंमलबजावणी झाली नाही तर ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी प्राणांतीक आमरण उपोषण करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे मुख्य संघटक संतोष पवार व समन्वयक अनिल जाधव हे स्वतः कामगारांसोबत बसणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

नगरपालिका प्रशासन संचालनालय आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांना महाराष्ट्र राज्य न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक संतोष पवार आणि समन्वयक अनिल जाधव यांनी ९ ऑगस्ट क्रांतीदिना पासून सूरु होणाऱ्या आमरण उपोषणाची नोटीस दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!