रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
रायगड : रोहा रेल्वे स्थानकाजवळील रोहिदास नगर परिसरात राहाणाऱ्या २४ वर्षाच्या नराधमाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहा पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सुल्तान शेख (वय २४) असे आरोपी तरुणाचे नाव असून पीडित अल्पवयीन मुलगी ही त्याला ओळखत होती व त्यानिमित्ताने पीडित मुलीच्या घरी त्याच ये-जा होत असे. अल्पवयीन मुलीच्या घरी ओळखीचा फायदा घेवून तीचे अज्ञानपणाची संधी साधुन तीच्याशी त्याने जवळीक केली. तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन मुलगी अल्पवयीन आहे या गोष्टीची माहिती असून देखील गेली दोन वर्षापासून तीचे सोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मंगळवार, दि. २३ जुलै २४ रोजी दु. १.४१ वा.च्या सुमारास खळबळजनक घटना समोर आली. याबाबत फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईला समजल्यानंतर आरोपीने फिर्यादी व अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत रोहा पोलिसात फिर्याद दाखल केली. तदनंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.
याबाबत रोहा पोलीस ठाण्यात गु.र.नं १४८/२०२४, भा.न्या.सं.का. २०२३ कलम ६५(१), ३५१ (२) बालकाचे लैगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ प्रमाणे रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन रोह्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी वर्ग सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.