• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएनपीटी परिसरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू, शीर धडावेगळे

ByEditor

Mar 17, 2026

​न्हावा-शेवा पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू

​उरण | विठ्ठल ममताबादे
जेएनपीटी परिसरातील गणेश बेंझोप्लास्ट कंपनीसमोर असलेल्या ‘वाय जंक्शन’ रोडवर मंगळवारी एक अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात एका ३३ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, धडक इतकी जोरात होती की मृताचे शीर धडापासून वेगळे झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार भैय्यालाल यादव (वय ३३, रा. अहीरोली, जौनपूर, उत्तर प्रदेश) हे जेएनपीटीकडून पीयूबी इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. हा अपघात इतका भयानक होता की सुशीलकुमार यांचा जागीच अंत झाला.

​घटनेची माहिती मिळताच न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीकांत नायडू यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा दरम्यान मृत व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक मोबाईल फोन सापडला, ज्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला असता, डॉक्टरांनी त्यांना ‘दाखलपूर्व मृत’ घोषित केले.

​याप्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात अ.मृ.रजी.क्र. ०३/२०२६ सह कलम १९४ BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी गणेश बासरे यांनी या घटनेची फिर्याद दिली असून, फरार अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पुढील तपास एपीआय श्रीकांत नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!