• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बांधकाम साईटवरून साहित्य चोरी करणाऱ्या आरोपींना पेण पोलिसांनी केले जेरबंद

ByEditor

Aug 4, 2024

४ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

विनायक पाटील
पेण :
मौजे दुश्मी ठाकुरपाडा ता. पेण येथील खारपाडा ते दुश्मी रोडवर रामेश्वर कन्स्ट्रक्शन पेण यांनी काँकीटचा रोड बनविण्याचे काम दि. २४ जून २०२४ रोजी सुरु केले होते. त्यांनी सदर कामाकरीता लागणारे एकुण ४० लोखंडी सी चॅनल साईटवर आणुन ठेवले होते. रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर केतन किशोर भोईर यांनी दिनांक २६ जून २०२४ रोजी सायं. ६ वाजता सदरचे लोखंडी सी चॅनल मोजुन ठेवले होते. त्यांचे काँक्रीट रोड बनविण्याचे काम दि. ३० जुलै २०२४ रोजी संपल्याने केतन भोईर यांनी सायं. ५ वाजताचे सुमारास साईटवरील लोखंडी सी चॅनल मोजले असता त्यामध्ये त्यांना ९ सी चॅनल कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदरचे सी चॅनल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले असलेबाबत केतन भोईर यांनी दि. ३१ जुलै २०२४ रोजी पेण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याने त्याबाबत गुन्हा रजि. नं. २२१ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे घटनास्थळी असलेले सीसीटिव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले. करण दिलीप वाकोडे (वय – ३० वर्ष सध्या रा. रामवाडी, ता. पेण, जि. रायगड मुळ रा. भुसगणी, ता. जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक) व राजेश रंजन चंद्रभुषण राय (वय – २४ वर्ष, सध्या रा. रामवाडी समर्थनगर, ता. पेण, जि. रायगड मुळ रा. राजौरा, पो. ठाणे ता. मुफसील, जि.बेगुसराई राज्य – बिहार) अशी आरोपींतांची नावे असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दि. ३१ जुलै २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्यांनी फिर्यादी केतन भोईर यांचे साईटवरुन चोरलेले लोखंडी सी चॅनल जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपीत यांनी चोरी करण्यासाठी वापरलेली टाटा एसीई टेम्पो क्रमांक एमएच ०४ एएफ ५३०२ हि देखील जप्त करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा पेणचे पोलीस उपनिरीक्षकसमद बेग, सहा. फौजदार राजेश पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र भोनकर, संतोष जाधव, सुशांत भोईर, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हसकोटी, पोलीस नाईक अमोल म्हात्रे व पोलीस शिपाई गोविंद तलवारे यांनी गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक करण्यात आली असून ४,६३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन मोलाची कामगिरी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!