• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण पोलीस ठाण्यात ‘दामिनी’ पथकाची पुनर्रस्थापना

ByEditor

Aug 6, 2024

विनायक पाटील
पेण :
महिला व मुली यांच्यावरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेची दखल घेऊन, पेण पोलीस स्टेशनमध्ये दामिनी पथकाची पुनर्रस्थापना करण्यात आली आहे. या अगोदर पेण पोलीस स्टेशनला दामिनी पथक होते. परंतु ते अधिक प्रभावीपणे सक्रिय करण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या चार महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकामध्ये मपोना शिंदे, मपोह पालवे, मपोह धनावडे, मपोह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना पेट्रोलिंगकरीता अद्ययावत मोटारसायकल व एमडीटी (११२) सेवा पुरविण्यात आली आहे. डायल ११२ ही सेवा तात्काळ मदत पुरविण्यासाठी कटिबध्द आहे.

सदर दामिनी पथक पोलीस अंमलदार हे खालील परिसरात नियमित गस्त घालणार आहेत

१) पेण बस स्थानक
२) सार्वजनिक विद्यामंदीर
३) प्रायव्हेट हायस्कुल
४) गुरुकुल शाळा
५) केईएस शाळा
६) कारमेल हायस्कुल
७) पतंगराव कदम हायस्कुल
८) आयटीआय कॉलेज रामवाडी
९) कंवडाळ तळा
१०) ठाकुर क्लासेस, चिंचपाडा
११) आर्या क्लासेस चावडीनाका
१२) ग्रिन पार्क
१३) महिलाआश्रम महाडीकवाडी
१४) विरेश्वर घाट, विसर्जन ठिकाण
१५) कुंभार तलाव
१६) गणपती विसर्जन ठिकाण
१७) भुंडा पुल
१८) मोतीराम तलाव

तरी पेण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व महिला भगिनी व मुलींना आवाहन करण्यात येते की, पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचार गुन्ह्याच्या अनुषंगाने काही मदत भासल्यास ११२ डायल करुन कॉल करा व तात्काळ मदत प्राप्त करुन घ्यावी असे पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी सांगितले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!