• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात, नांदेड विमानतळाकडे जात असतानाची घटना

ByEditor

Aug 8, 2024

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड शहरातील आसना बायपास परिसरात गाडी डिव्हायडरच्या खड्ड्यामध्ये उतरली.

या गाडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. आदिती तटकरे यांचा ताफा भोकरचा कार्यक्रम आटोपून नांदेड विमानतळाकडे येत होता. या दरम्यान नांदेड शहरालगत आसना बायपास परिसरात आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या अपघातात फॉर्च्यूनर गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे याच्या उपस्थित नांदेडच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आदिती तटकरे नांदेड विमानतळाकडे जात असताना ही अपघाताची घटना घडली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!