जिल्हास्तरीय स्पर्धेत मंजिरी करणार तालुक्याचे प्रतिनिधित्व
विनायक पाटील
पेण : पेण शिक्षण महिला समितीचे श्रीमती सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालय येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात श्रीमती सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालय पेणची विद्यार्थिनी कु. मंजिरी महेंद्र पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मंजिरी पाटील ही पेण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाचे पेण तालुक्यात कौतुक होत आहे. विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, मंजिरीचे आई-वडील तसेच माजी विद्यार्थी संघटना दादर या सर्वांनी मंजिरी हिचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.