• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून उरण येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन

ByEditor

Aug 19, 2024

विनायक पाटील
पेण :
जागतिक छायाचित्र दिनाचे औचीत्य साधून उरण येथील जवाहर लाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या वतीने रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्या छायाचित्रकारांसाठी जे एन पी ए च्या परिसरातील छायाचित्रीकरणासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. एक छायाचित्र खूप काही सांगून जातं. छायाचित्रामधून अनेक गोष्टींचा उलघडा होण्यास मदत होते. असे उद्गगार जे एन पी ए चे वाहतूक शाखेचे जनरल मॅनेजर गिरीश थॉमस यांनी या दौऱ्यात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमावेळी काढले. वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर आंबिका सिंघ, मार्केटिंग – ट्राफिक चे डेप्युटी मॅनेजर एम. डी. डोंगरे, मार्केटिंग एक्सिकूटिव्ह वर्षा मेहता, संदीप पाटील यांनी या अभ्यास दौऱ्याचे उत्तम नियोजन केले होते.

भारतातील अव्वल असलेल्या उरण तालुक्यातील नाव्हा शेवा येथील निसर्गाने नटलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट परीरातील सौन्दर्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर पोर्टच्या प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन देखील ठेवण्यात आले होते. पहिल्या सत्रात भारतात नवाजलेल्या अशा या पोर्टवर जगभरातून येणाऱ्या व्हेसल्स मधून येणारे कंटेनर क्रेनच्या साहाय्याने कसे उतरवले जातात अशा प्रकारच्या अनेक कामांचे छायाचित्र काढण्याची संधी या दौऱ्याच्या निमित्ताने रायगड मधील छायाचित्रकारांना मिळाली.
तर दुसऱ्या सत्रात पोर्ट प्रशासकीय इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोटोग्राफर्स असोसिएशनचे सदस्य सुशील घाटवल आणि सहसचिव दीपक बडगुजर यांनी मोबाईल फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे , सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, कार्यकारिणी सदस्य अविनाश राऊत, प्रीतम सकपाळ, मनोज पाटील, तुषार थळे, योगेश कुंभार, समाधान पाटील, रुपेश महाडिक, योगेश बोराणा, चेतन केळकर, चैतन्य पाटील यांच्यासह असोसिएशनचे 16 सदस्य या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!