• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिष्यवृत्ती परीक्षेत शर्व पाटकर शहरी विभागात तालुक्यातून प्रथम

ByEditor

Jul 14, 2023

महाड : इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या महाड येथील दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी शर्व सुनील पाटकर हा महाड तालुक्यातून शहरी विभागात प्रथम तर रायगड जिल्ह्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी न ठेवता शर्वने हे यश मिळवले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून 12 फेब्रुवारी 2023 ला ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. 13 जुलैला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.अत्यंत आव्हानात्मक अशा या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाड तालुक्यातून ९०७ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी 173 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यापैकी 61 जणांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. यात शहरी विभागामध्ये शर्व पाटकर यांनी महाड तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये शर्वने चौथा क्रमांक पटकावला आहे. दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम शाळेचे अकरा विद्यार्थी तालुका व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी चमकले. यामध्ये ओवी पाटील तालुक्यात दुसरी जिल्ह्यात सातवी, यश डोळे तालुक्यात तिसरा जिल्हा चोविसावा, निधी कदम 4/35, मनस्वी खैरे 5/65,आराध्य आंबोणकर 6/78, अनुश्री मढवी 7/95,स्वरा शेवरकर 8/98, आर्वा देशमुख 9/114, किरण पवार 10/121व राजवीर पाटेकर 11/121 यांनी तालुका व जिल्ह्यात क्रमांक पटकावले आहेत.

शर्वच्या तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन दिलीप पार्टे, मुख्याध्यापिका वीणा मुखिया, शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!