• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोठ बु. ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

ByEditor

Jul 17, 2023

नंदकुमार मरवडे
खांब :
स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोहा तालुक्यातील रोठ बु. ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून पाहणी करून ग्रामपंचायतीच्या या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

या समितीने अंगणवाडी शाळा, सार्वजनिक शौचालय, गांडूळ खत प्रकल्प आदी स्वच्छ्ता उपक्रमांची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच नितीन वारंगे, सुरेश पाटील.संजय वाघ, ग्रामसेविका अलका बामुगडे, अमित घाग, रक्षित देशमुख, रत्नदीप चावरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. तर कमिटी प्रमुख डाॅ. सत्यजित देशमुख, संवादतज्ञ संजय वाघ, समाज शास्त्रज्ञ वैशाली जगताप, सुरेश पाटील, सहा. गटविकास अधिकारी महारूद्र फडतरे, विस्तार अधिकारी सुनिल गायकवाड, उपसरपंच वेदिका डाके, सदस्य आमित घाग, ज्ञानेश्वर साळुंखे, वैभवी भगत, अक्षदा वारंगे, स्वप्नाली देवकर तसेच गावातील तंटामुक्त अध्यक्ष दिलीप वारंगे, ग्रामस्थ रमेश मोरे, तुकाराम वारंगे, विलास डाके, राजेश डाके, दिनेश साळुंके, यशवंत गोसावी, निरंजन वारंगे, शशिकांत साळुंखे, अमृता साळुंखे, सुप्रिया वारंगे, रोहिणी गोसावी आदी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!