• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण महिला आघाडी आक्रमक

ByEditor

Jul 18, 2023

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली दिले उरण पोलीस स्टेशनला निवेदन

घन:श्याम कडू
उरण :
भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचे लोकशाही टीव्हीने जे पोलखेल करून वादग्रस्त व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनते समोर आणले आहेत त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात महिलांमध्ये जनोक्रोश निर्माण झालेले आहे, आणि त्याचाच भाग म्हणून शिवसेना उरण तालुका व शहराच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर,गटनेते श्री गणेश शिंदे व उपजिल्हा संघटिका ममता पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम यांना निवेदन सादर करून पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी महिला आघाडीच्या तालुका संघटिका भावना म्हात्रे, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, शहर संपर्क संघटिका वंदना पवार, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्ष मुमताज भाटकर, तालुका उपाध्यक्ष रुबीना कुट्टी, विभाग संघटिका रूपा सिंग, महिला आघाडीच्या पदाधिकारी जागृती घरत, हसीमा सरदार, मालिनी वायदांडे, मानसी पुरो, सुनीता गाडे, रश्मी घरत, रूपा पवार, कल्पना थळी, मा. शहर संघटक महेश वर्तक, सम्राट घरत व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!