• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जे झालं त्यावर विश्वास बसत नाही, याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही! अक्षय शिंदे प्रकरणी कोर्टानं पोलिसांना फटकारलं!

ByEditor

Sep 25, 2024

वृत्तसंस्था
मुंबई :
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारले आहे. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आल्यास योग्य तो आदेश देण्यास भाग पाडले जाईल, असेही स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले
आपल्या मुलाचा मृत्यू हा गणवेशधारी लोकांनी केलेला निर्घृण खून आहे, असा दावा करत अक्षच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अक्षय शिंदे याने पोलीस वाहनात पोलिसांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. याबाबत न्यायमूर्तींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अक्षयने पोलिसांची पिस्तुल कशी हिसकावली? ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. तसेच एखादा कमजोर व्यक्ती पिस्तूल लोड करू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हा एन्काऊंटर असू शकत नाही
‘अक्षय शिंदेला पोलिसांनी आधी पकडण्याचा प्रयत्न का केला नाही? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते. ज्या क्षणी आरोपीने ट्रिगर ओढला, त्याचवेळी त्याला रोखता आले असते. इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखले का नाही? तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणे कठीण आहे. हा एन्काऊंटर असू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!