नगराध्यक्ष पदी शर्मिला सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदी हर्षदा सोंडकर-काळे होणार विराजमान
सलीम शेख
माणगाव : माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाच्या नगरसेविका हर्षदा सतिष सोंडकर यांनी आपला नामनिर्देशन अर्ज शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी दु. १२ वाजता नगरपंचायत कार्यालय याठिकाणी निवडणुकीचे अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे दाखल केला. या दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाच्या नगरसेविका हर्षदा सतिष सोंडकर यांची निवड बिनविरोध झाली असून त्यावर दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणुकीच्या होणाऱ्या विशेष सभेत अधिकृत घोषणा या निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी केल्यानंतर शिक्कामोर्तब होणार आहे. शर्मिला सुर्वे व हर्षदा सोंडकर यांचे माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून आभिनंदन होत आहे.

माणगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) व भाजप पक्षाच्या महायुतीचे वर्चस्व आहे. या नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व माजी उपनगराध्यक्ष राजेश मेहता यांनी आपल्या पदांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यावर राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदांसाठी येत्या ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत असून त्याकरिता नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या दिवशी दि. २७ सप्टेंबरला नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाच्या नगरसेविका हर्षदा सतिष सोंडकर यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
हे दोन्ही नामनिर्देशन अर्ज दाखल करताना शिवसेनेचे राज्य प्रवक्ते ॲड. राजीव साबळे,,राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, दक्षिण रायगड भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणगाव शहराध्यक्ष नितीन वाढवळ, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी उपनगराध्यक्ष राजेश मेहता, माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, शहरप्रमुख सुनील पवार, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सुविधा खैरे, नगरसेविका नंदिनी बामगुडे, नगरसेविका रिया उभारे, नगरसेविका ममता थोरे, नगरसेविका लक्ष्मी हिलम, स्वीकृत नगरसेवक मनोज पवार, माजी नगरसेवक सिराज परदेशी, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, युवा नेते सुमित सचिदानंद काळे, साहिल गायकवाड, राजेंद्र सुर्वे, प्रभाकर मसुरे, शेखर गोडबोले आदींसह महायुतीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.