• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाचा जोर वाढताच आंबेनळी घाटामध्ये कोसळले मोठे मोठे दगड

ByEditor

Jul 18, 2023

देवेंद्र दरेकर
पोलादपूर :
मागील काही दिवसांपासून पोलादपूर तालुक्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना या घडतच असून मंगळवारी रात्री पोलादपूर -महाबळेश्वर आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड येथे दरड कोसळलेली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला असून मंगळवारी पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून मंगळवारी रात्रीच्या सुमारास आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड गावच्या हद्दीमध्ये घाटात भली मोठी दरड कोसळली असून मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. पोलादपूर व महाबळेश्वर या दोन्ही बाजूकडून घाटांमधील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्यासाठी यंत्रणादेखील दाखल झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!