किरण लाड
नागोठणे : सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीचे पात्र तुडुंब भरुन वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन पुराचे पाणी बसस्थानकात शिरले आहे.

भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला दि. 17 जुलै ते दि. 21 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही भागात अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. नागोठणे येथील अंबा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाणी नदीच्या पात्रातुन बाहेर आल्याने पुराचे पाणी नागोठणे बस स्थानकात शिरले आहे. एसटी बसस्थानक पाण्याने पुर्ण भरल्याने बस सेवा विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी बाजारपेठ, कोळीवाडा, बंगळेआळी, मोहल्ला या भागात शिरण्याची शक्यता आहे. नागोठण्यात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.