• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली

ByEditor

Jul 19, 2023

देवेंद्र दरेकर
पोलादपूर :
रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये देखील मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पोलादपूर शहरात काही ठिकाणी सावित्री नदीचे पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तालुक्यातील माटवन सवाद या विभागात देखील पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पोलादपूर शहराशी काही गावांचा संपर्क तुटलेला आहे.पावसाचा जोर वाढत राहिला तर पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!