• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लायन क्लब ऑफ पेण प्राईडतर्फे चिंचपाडा येथे नेत्र चिकित्सा केंद्र सुरू

ByEditor

Oct 6, 2024

विनायक पाटील
पेण :
लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड यांच्यातर्फे नेत्र चिकित्सा केंद्राचे उद्घाटन पेण येथील गुलमोहर बिल्डिंग, चिंचपाडा चौक येथे करण्यात आले. अलिबाग लायन हेल्थ फाउंडेशन संचलित नेत्र तपासणी केंद्राचे उद्घाटन लायन इन्टरनॅशनलचे प्रथम प्रांतपाल एमजेएफ संजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित द्वितीय प्रांतपाल एमजेएफ प्रवीण सरनाईक, एस. एन. मूर्ती, साईट फर्स्टचे प्रमुख एमजेएफ नितीन अधिकारी, एमजेएफ नयन कवळे, डिस्ट्रिक्ट विभागीय अध्यक्ष एमजेएफ विजय वनगे, हेल्थ फाउंडेशनचे सीईओ लायन शुभदा कुतडरकर व पेण येथील ज्येष्ठ समाज सेवक अण्णा कडू, डी. सी. हेल्थ एमजेएफ शशिकांत भगत, प्रदीप पाटील, रोहन मनोरे, राधा रोहन मनोरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

सदर नेत्र चिकित्सा केंद्राचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडचे उपाध्यक्ष लायन प्रमोद पाठक, सचिव लायन राजेश मुळे, खजिनदार वीरेंद्र पटेल, लायन अशोक भगत, लायन विश्वास पाटील, लायन अतुल मढवी, लायन अनंत कोळी, लायन कृष्णा साकोस्कर, संस्कृती भगत, वैष्णवी भगत हे लायन्स मेबर उपस्थित होते. तसेच खारपाडा येथील 2 ऑगस्ट रोजी झालेल्या आरोग्य शिबिरातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतरच्या तपासणी करता आलेले रूग्ण उपस्थित होते. पेण येथील नेत्र चिकित्सा केंद्र हे सर्वांसाठी दर शनिवारी 10 ते 3 या वेळेत नेत्र चिकित्साकरिता उघडे राहणार आहे. तरी पेण तालुक्यातील परिसरातील रुग्णांनी मोतीबिंदू व डोळ्यांच्या इतर विकारांवर उपचाराकरीता व तपासणीकरीता या नेत्र चिकित्सा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन डी. सी. हेल्थचे एमजेएफ शशिकांत भगत यांनी लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड यांच्या वतीने जनतेला केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!