• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा रेल्वे स्थानकात रेल्वेतून पडून तरुण जखमी

ByEditor

Oct 6, 2024

रोहा : रोहा रेल्वे स्थानकात रविवारी (दि. 6) सकाळी दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून पडून तरुण ट्रेन व फलाटमध्ये अडकून जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणावर रोहा तालुका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोहा रेल्वे स्थानकामध्ये दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून प्रेम प्रदीप कांबळे (वय 25, रा. म्हसळा, जि. रायगड) या तरुणाचा पाय घसरल्याने प्रेम कांबळे रेल्वे व फलाटाच्यामध्ये अडकला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे टीम व धाटाव अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले व पुढील उपचाराकरिता रोहा तालुका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!