• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उरण विधानसभा निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न

ByEditor

Oct 7, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
महाराष्ट्रमध्ये राज ठाकरे यांचा दौऱ्याचा झंजावात सुरू असताना १९० उरण विधानसभेसंदर्भात रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उरण विधानसभेची बैठक रविवारी (दि. ६) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित राहुन उरण विधानसभेसाठी इच्छुक म्हणून ॲड. सत्यवान भगत यांना आमदारकी लढवण्यासाठी सर्वांमध्ये ठराव घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कामाला लागण्याचे आदेश मनसेच्या माध्यमातून देण्यात आले.

यावेळी राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन भाजपचे भालचंद्र म्हात्रे (भाई) यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मनसेत प्रवेश केला. या बैठकीसाठी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संदेशभाई ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, उरण तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत, तालुका सचिव अल्पेश कडू, पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष गोंधळी, चिंतामणी मुंगाजी, दीपक पाटील, महिला उरण तालुकाध्यक्षा कविता म्हात्रे, रोजगार स्वयंरोजगार सेनेच्या मालती म्हात्रे, वाहतूक संघटनेचे साईराज माळी, विभाग अध्यक्ष पराग म्हात्रे, बबन ठाकूर, संदीप ठाकूर, कर्नाळा विभाग अध्यक्ष आशिष, शेखर म्हात्रे, किरण भाकुरलेकर, विलास नवाळी, हेमंत बंडा, जितेंद्र पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!