• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाड लायन्स क्लब आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByEditor

Oct 8, 2024

५० जणांची तपासणी, १६ रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे लायन्स क्लब कोलाड, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्यावतीने व ग्रूप ग्रामपंचायत तसेच तंटामुक्त समिती पुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला येथील रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत सदरच्या शिबिरात पन्नासहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. १६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून दृष्टी लाभणार आहे.

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ यांच्या कृपाछत्राखाली तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे अविरतपणे कोलाड विभाग परिसरात कोलाड लायन्स क्लब ही सेवाभावी संस्था सामजिक, शैक्षणीक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करत ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत आहे. तर ऑक्टोबर दरम्यान या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला सेवा सप्ताह या उपक्रमाच्या माध्यमातून पुगाव येथील स्व. हरिभाऊ म्हसकर वाचनालय सामाजिक सभागृहात सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला भरभरुन प्रतिसाद मिळाला तर पन्नासहून अधिक रुग्णांची तपासणी करून १६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. मंगेश सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार राजेंदर कोप्पू, उपाध्यक्ष डॉ. विनोद गांधी, डॉ. श्याम लोखंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायणराव धनवी, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, बबन म्हसकर, गणेश म्हसकर, येलकर गुरुजी, राम धुपकर, मिलिंद गोठम, हरेश धुकोर, सुनील म्हसकर, रचना कळमकर, राम कळमकर, सुधीर शेळके, संदीप कळमकर, दिनेश देशमुख, ललित म्हसकर, लायन मेंबर्स नंदकुमार कळमकर, अनिल महाडिक, मारुती मालुसरे, पुजा लोखंडे, रिया लोखंडे, दिनकर सानप, विश्र्वास निकम, विठ्ठल सावळे यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व लायन मेंबर्स तसेच पुगाव ग्रामस्थ आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग तपासणी टीम उपस्थित होते .

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत अधिकारी यांनी केले तर प्रास्ताविक प्रमोद म्हसकर, रविंद्र लोखंडे यांनी केले. याप्रसंगी उपस्थित रुग्णांना लायन्स क्लबच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमाबाबत अध्यक्ष डॉ. मंगेश सानप, डॉ. श्याम लोखंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायणराव धनवी यांनी विशेष मार्गदर्शन करत लायन्स क्लबच्या कामाचे कौतुक करून सामजिक बांधिलकीचे जतन करून गोरगरीब, कष्टकरी जनतेची उत्तम सेवा करत असल्याची प्रशंसा करत आभार व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!