अनंत नारंगीकर
उरण : जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व, आपला माणूस युवा नेतूत्व प्रितम म्हात्रे हे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत १९० उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून जनता मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत असून त्यांच्या मागे उरण, पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी जनता खंबीरपणे उभी राहणार असा विश्वास गव्हाण विभागातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उरण, पनवेल तालुक्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, असे असतानाही या तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी, आदिवासी बांधवांना, नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने विकासाचा चेहरा म्हणून युवकांचा नेता म्हणून प्रितम म्हात्रे यांच्याकडे या तालुक्यातील युवक मोठ्या आशेने पाहत असताना त्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत १९० उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत सध्या गावोगावचे अबालवृद्ध विशेष करून युवक वर्ग कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता ठिकठिकाणी बँनर बाजी करुन करत आहेत. हि प्रितम म्हात्रे यांच्या विजयाची नांदी असून त्यांच्या मागे प्रकल्पग्रस्त, शेतकरी, जनता खंबीरपणे उभी राहणार असल्याचे मत गव्हाण विभागातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर नामदेव पाटील यांनी व्यक्त केले आहे.