अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सानिका सतिश घाडी यांचा सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी असलेला वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांना दिवसभर सोशल मीडियाच्या व वैयक्तिक फोनवर तसेच प्रत्यक्षात घरी जाऊन अनेक मान्यवरांनी तसेच त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवारांनी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन शतायुषी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी घाडी कुटुंबातील सदस्य व पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांसह घाडी सर्व गटातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सानिका घाडी यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला गेला.