• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

ByEditor

Oct 23, 2024

आदिती तटकरे १ लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार

सलीम शेख
माणगाव :
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष या महायुतीच्या अधिकृत उमेदवार, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे या शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला नामनिर्देशन अर्ज श्रीवर्धन येथे दाखल करणार आहेत. या निवडणुकीत श्रीवर्धन मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांना १ लाखाहून अधिक मताधिक्याने विजय करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला आहे.

शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. सुनील तटकरे, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. भरत गोगावले, अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, खा. धैर्यशील पाटील, माजी आ. अनिकेत तटकरे, भाजपा संघटक सतीश धारप यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता श्रीवर्धन उपविभागीय कार्यालयात महायुतीच्या अधिकृत उमेदवार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी माणगाव,म्हसळा, तळा, रोहा व श्रीवर्धन तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. महायुतीच्या मित्र पक्षांसह आम्ही एक दिलाने हि निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वास हि त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!