• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, सिलेंडरचा भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू

ByEditor

Oct 30, 2024

नवी मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावला गावात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील उलवे उलवेमधील जावला गावात आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. एका किराणा मालाच्या दुकानामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुकानात छोटे सिलेंडर विक्रीसाठी ठेवले होते. एवढंच नाहीतर या दुकानात पेट्रोलची सुद्धा विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!