• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

191 पेण विधानसभा होणार चुरशीची; निवडणूक रिंगणात ७ उमेदवार

ByEditor

Nov 4, 2024

विनायक पाटील
पेण :
१९१ पेण विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे. यावेळी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून तीन उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे रवीशेठ पाटील शेकापचे अतुल म्हात्रे आणि शिवसेना ऊबाठा गटाचे प्रसाद भोईर या तिघांपैकी जनता कोणाला मतदान रुपी कौल देऊन विजयी करणार हे काहीच दिवसात पाहायला मिळणार आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे संजय म्हात्रे यांच्यासह सुरेश खैरे, नमिता नंदकुमार म्हात्रे, पल्लवी प्रसाद भोईर, दशरथ साळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु प्रसाद भोईर (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) किंवा अतुल म्हात्रे (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

१९१ पेण विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत रवींद्र दगडू पाटील (भाजपा) चिन्ह – कमळ, देवेन मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी) चिन्ह – गॅस सिलेंडर, प्रसाद केळुराम भोईर (शिवसेना, उबाठा), चिन्ह – मशाल, अतुल नंदकुमार म्हात्रे (शेकाप), चिन्ह – शिट्टी, विश्वास मधुकर बागुल (अपक्ष), चिन्ह – इस्त्री, मंगल परशुराम पाटील (अभिनव भारत पार्टी), चिन्ह – माईक, अनुजा उर्फ अनु केशव साळवी (बहुजन समाज पार्टी), चिन्ह – हत्ती, हे सात उमेदवार रिंगणात आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!