• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण मतदार संघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ByEditor

Nov 4, 2024

अनंत नारंगीकर
उरण : १९० उरण विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखले केले होते. त्यापैकी आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याची माहिती मिळाली आहे.

उरण विधानसभा निवडणुकीत छाननीनंतर १६ उमेदवारांचे १७ उमदेवारी अर्ज वैध ठरले होते. त्यामधील संतोष हिराजी ठाकूर (अपक्ष ) आणि जितेंद्र दामोदर म्हात्रे (अपक्ष) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता १४ उमेदवार हे उरण विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उभे आहेत अशी माहिती सहाय्य्क निवडणूक निर्णय अधिकारी उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली आहे.

निवडणूक रिंगणात असणारे उमेदवार पुढील प्रमाणे :

श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष)
कुंदन प्रभाकर घरत (अपक्ष)
सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी)
नीलम मधुकर कडू (अपक्ष)
बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष)
कृष्णा पांडुरंग वाघमारे (अपक्ष)
मनोहर परशुराम भोईर (अपक्ष)
मनोहर गजानन भोईर (शिवसेना ठाकरे गट)
महेश रतनलाल बालदी (भारतीय जनता पार्टी)
महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी)
प्रीतम धनाजी म्हात्रे (अपक्ष)
प्रीतम बळीराम म्हात्रे (अपक्ष)
प्रीतम जनार्दन म्हात्रे (शेकाप)
सत्यवान पंढरीनाथ भगत (मनसे)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!