• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भात शेतीत आढळले अजगर, मंजूरांची उडाली धावपळ!

ByEditor

Nov 7, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
चिरनेर गावाजवळ सुरु असलेल्या भात शेतीच्या कापणी व मळणी ठिकाणी भले मोठे अजगर आढळून आले. त्यामुळे भला मोठा अजगर पाहून मजूरांमध्ये धावपळ उडाली. याबाबत प्राणी मित्र राजेश पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अजगरची सुखरूप सुटका केली. या परिसरात पहिल्यांदाच भात शेतीच्या कामात मोठा अजगर आढळून आला आहे. हा अजगर सुमारे ८ फूट लांबीचा असून त्याला जंगलात सोडण्यात आले आहे.

चिरनेर हे गाव डोंगर परिसरात वसलेले गाव आहे.परंतु डोंगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या वन्यप्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांना खाद्य मिळू न लागल्याने वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांनी आपला मोर्चा हा नागरी वस्ती ठिकाणी वळवला आहे. त्यात सध्या भात शेती कापणी व मळणीची कामे जोरात सुरू आहेत. अशातच चिरनेर गावातील किरण ठाकूर यांच्या घराजवळ एक मोठा अजगर आढळून आल्याची घटना घडली. त्यानंतर रमाकांत ठाकूर व सुनील ठाकूर यांच्या भात शेती कापणी व मळणीच्या ठिकाणी भले मोठे अजगर आढळून आले असता मंजूरांची एकच धावपळ उडाली. याची माहिती मोठे भोम गावातील सर्प तथा प्राणी मित्र राजेश पाटील यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अजगराची सुटका करून जंगलात सोडण्याचे काम केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!