विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुका कुणबी युवक समाजाचे माजी अध्यक्ष, तालुक्याचे उपाध्यक्ष तसेच ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांनी निःस्वार्थी समाजकार्य केल्याबद्दल साहित्य संघ मुंबई येथे कुणबी युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे पुरस्कार देऊन साहित्य संघ मंदिर मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल अनंत थिटे यांचा रोहा तालुका कुणबी समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शामराव पेजे अर्थिक विकास मंडळाचे संचालक सुरेश मगर, तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, उपाध्यक्ष संतोष खेरटकर, गुणाजी पोटफोडे, खजिनदार सुहास खरीवले, सहसचिव यशवंत हळदे, सह खजिनदार मारुती मालुसरे, सतिश भगत, कार्यकारणी सदस्य मोरेश्वर खरिवले, युवा नेतृत्व मुकेश भोकटे, सद्स्य ज्ञानेश्वर दळवी, चंद्रकांत भगत, तेलंगे तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी अनंत थिटे यांचा सत्कार करून रोहा तालुका कुणबी समाजाच्यावतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.