• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत यांना मातृशोक

ByEditor

Nov 7, 2024

वार्ताहर
उरण :
उरणमधील जेष्ठ पत्रकार आशिष घरत यांच्या मातोश्री माजी तहसीलदार सौ. मनीषा मनोहर घरत यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्यावर उरण बोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दीर, भावजय, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर येथे सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. तर उत्तरकार्य रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी राहत्त्या घरी “रमेश रेसिडेन्सी” चारफाटा येथे करण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे घरत कुटूंबियांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!