अब्दुल सोगावकर
सोगाव : आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४च्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे चोंढी व झिराड येथे गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता रुटमार्च काढण्यात आला.
मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४च्या अनुषंगाने मांडवा सागरी पोलीस सज्ज झाले असून निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये व विधानसभा निवडणुका निर्विवाद आणि शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झिराड येथे मांडवा पोलीस ठाणे ते पाटील पोल्ट्री – बाजार पेठ – वैभव हॉटेल – स्टेट बॅंक तसेच चोंढी येथे चोंढी नाका – अपना बाजार – रेल्वे फाटक – मुख्य बाजारपेठ – चोंढी पूल याठिकाणी पद पथसंचलन (रूटमार्च) करण्यात आले. सदर रूटमार्च वेळी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे २ अधिकारी, १० अंमलदार तसेच सीआयएसफचे ४६ जवान उपस्थित होते.