सलीम शेख
माणगाव : गावातील साफसफाईचे पैसे मागितल्याच्या राग आल्याने मारहाण शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना विळे विभागातील मौजे बेडगाव येथे घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महादेव शिंदे व आरोपी काशिराम शिंदे हे नात्याने चुलत भाऊ असून आरोपी प्रमोद शिंदे, प्रफुल शिंदे हे नात्याने पुतणे आहेत. फिर्यादी महादेव शिंदे यांनी प्रफुल शिंदे यांच्याकडे गावातील साफसफाईच्या कामाचे पैसे मागितले असता त्या गोष्टीचा राग येऊन आरोपी प्रफुल व काशिराम यांनी संगनमत करून फियांदी यास हाताबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. पवार करीत आहेत.