पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना असलेल्या मार्गावर हा अपघात झाला. मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या ट्रकवर खासगी बस आदळली. या अपघातामध्ये बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. वाहतूक पोलीस मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
हा भीषण अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे-मुंबई लेनवरील खोपोली हद्दीत बोरघाट उतराना नवीन बोगद्यामध्ये झाला आहे. ट्रकमधील हवा कमी झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा करण्यात आला होता. त्यावेळी पाठीमागून येणारी बाळूमामा कंपनीची खाजगी बस क्र.एमएच 03 डीव्ही 2412 या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला आहे. या बसमध्ये एकूण 38 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
गंभीर जखमी झालेले प्रवाशी
1) मनीषा भोसले
2) सुनिता तराळ
3) बालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक)
4) संकेत सत्तपा घारे (सह चालक)
5) अभिजित दिंडे
6) सरिता शिंदे
7) संदीप मोगे
8) सोनाक्षी कांबळे
किरकोळ जखमी झालेले प्रवाशी
1) सना बडसरिया
2) शिवांश
3) तनिष्का
4) हर्ष
5) अद्विका
6) गरिमा पाठक
7) प्राची
8) श्रेया
9) समीक्षा
10) साक्षी रेपे
11) मानसी लाड
12) जोहा अन्सारी
13) अमित शहा
14) दीक्षा
15) चेतन भोपळे
16) माही
17) शौर्य
18) आदिल
अपघातानंतर काही काळ या लेनवरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, अपघातातील बस व ट्रक दोन्ही वाहने पुलरच्या सहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सद्यस्थितीत सुरळीत चालू करण्यात आलेले आहे.