• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

किहीम येथे अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ

ByEditor

Nov 11, 2024

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
तालुक्यातील किहीम येथील राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ करण्यात आला. विभागातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी ह्या क्रिकेट अकॅडमीची सुरवात करण्यात आली आहे. क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून ऋषिकेश राऊत यांच्या देखरेखीखाली युवा खेळाडूंची प्रतिभा वाढवण्यासाठी काम करणार असून क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्फत उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणाबरोबर खेळालाही तितकेच महत्त्व आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. अलिबाग क्रिकेट अकॅडमीच्यावतीने विविध वयोगटातील मुलांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाणार आहे. ह्या क्रिकेट अकॅडमीमध्ये मुलांच्या बरोबरीने मुलींना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अलिबाग क्रिकेट अकॅडमीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद दळवी माजी रणजीपटू महाराष्ट्र, किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील, सहसचिव जयंत नाईक, डॉ. राजाराम हुलवान अध्यक्ष माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, नितिन अधिकारी लायन्स हेल्थ फाऊंडेशन व्हाईस चेअरमन, अलिबाग तालुका क्रिकेट असो. सचिव प्रकाश पावसकर, अभय घरत अलिबाग ता. क्रि. असो. सदस्य, संदीप जोशी आरपीएल सहसचिव, प्रीतम पाटील, प्रसाद पिळणकर, राकेश म्हात्रे तसेच राजा शिवछत्रपती किहीम मंडळाचे सर्व प्रतिनिधी व खेळाडू उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!