• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळणार नेता!

ByEditor

Nov 11, 2024

माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित

रामचंद्र घोडमोडे
श्रीवर्धन :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर श्रीवर्धन मतदार संघातील सर्व तालुक्यांमध्ये पक्ष बांधणी चालू होती. परंतु श्रीवर्धन तालुक्यात पक्षाची धुरा सांभाळण्यास कोणीही पुढे येत नव्हता. मात्र आता माजी जिल्हा परिषद सदस्य शाम भोकरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राजीनामा देत शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. त्याची तारीख सुद्धा जाहीर केली असून १४ नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून माणिकराव जगताप यांच्या बरोबर काम करत होतो. माणिकराव जगताप यांच्यामुळे मी पक्षांमध्ये आलो. तटकरे साहेबांचे आगमन नंतर झाले. मला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा दिलेला शब्द पाळला नसल्याने मी शिवसेना शिंदे गटात गेलो होतो. आमदार भरतशेठ यांनी आम्हाला खूप मदत केली. पण मतदार संघाचा आमदार असल्याने खूप फरक पडतो म्हणून मी पुन्हा राष्ट्रवादीत आलो. खूप मेहनत केली, साहेबांना निवडून आणलं पण काही जणांना ते वाईट वाटलं. तालुक्यात अंतर्गत गटबाजी खूप असुन दहा जणांना घेऊन राष्ट्रवादी भवनामध्ये साहेबांना भेटलो, सर्व सांगितलं पण गांभीर्य घेतलं नाही. शरद पवार साहेबांचा पहिल्यांदा फोन आला, भारावून गेलो. तटकरेंनी कधी पवार साहेबांची भेट घडवून आणली नाही. पक्षाने हकालपट्टी करण्याआधी मी तीन वेळा राजीनामा दिला असल्याचा उल्लेख भोकरे यांनी केला.

श्याम भोकरे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढली असून श्रीवर्धन तालुक्यात शरद पवार गटाला नेता मिळाला असून याचा फायदा अनिल नवगणे यांना होणार का? हे निवडणुकीनंतरच सिद्ध होईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!