अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावून स्वतःच्या पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील (रा. अलिबाग जि. रायगड) यांच्याविरोधात मनोज मारुती गोतारणे (वय-४३ वर्षे, व्यवसाय नोकरी, नायब तहसिलदार कुळ वहिवाट शाखा जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, रा. रुम नं.304 कृष्णा मंदीर बिल्डिंग, मारुती नाका अलिबाग ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आदर्श आचार संहिता निवडणुक आयोगाने लागू केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील विविध शाखेत जाऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा स्वतःचा प्रचार केला म्हणून चित्रलेखा नृपाल पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी रायगड यांचे जावक क्र. निवडणूक /आचार संहिता आणि कायदा सुव्यवस्था /२०२४ दि. ०५/११/२०१५ रोजी जारी केलेल्या आदेशाचे अवमान करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे.
याबाबत अलिबाग पोलिस ठाणे येथे २२३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सौदरमळ हे करीत आहेत.