• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोरपाडा येथे नाहरकत दाखल्यातील अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

ByEditor

Nov 13, 2024

अमुलकुमार जैन
रायगड :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा या राज्य महामार्गावरील बोरपाडा येथे नाहरकत दाखल्यातील अटी शर्तीचा भंग करीत शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी विश्वनाथ धर्मा भगत भगत, चंद्रकांत विष्णु भगत (दोघेही राहणार बोरपाडा पो. बामणगाव ता. अलिबाग जि. रायगड) या दोघांविरुद्ध काविर ग्रामविकास अधिकारी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील काविर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बोरपाडा हद्दीत विश्वनाथ धर्मा भगत यांनी शेकापक्षाच्या विधानसभेच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचे बॅनर तसेच चंद्रकांत विष्णु भगत यांनी महायुतीचे शिंदे गटाचे अलिबाग मुरुड विधानसभाचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचाराचे बॅनर खाजगी जागेत लावण्या बाबतचे पत्र त्यांना अटी व शर्तीद्वारे ग्रामपंचायत काविर यांचा नाहरकत दाखला दिला असता त्यांनी सदरचे नाहरकत दाखल्यातील अटी व शर्तीचा भंग करीत सदरचे बॅनर खाजगी जागेत न लावता एमएसईबीचे पोल या शासकीय मालमत्तेवर लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केले. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात २२४/२०१४ महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!