• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये निवडणूक वातावरण थंड!

ByEditor

Nov 12, 2024

घन:श्याम कडू
उरण :
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना मात्र उरणमध्ये मतदान ८ दिवसांवर येऊनही अद्याप निवडणूक वातावरण थंड असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उरण विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षात राजकीय सभा होत आहेत. तसेच सर्वत्र राजकीय वातावरण जसजसे मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. परंतु याबाबत उरण परिसर अपवाद ठरताना दिसत आहे.

उरण परिसरात तर विधानसभा निवडणूक आहे की नाही असे वातावरण दिसत आहे. नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती असते त्यापेक्षा काहीच राजकीय वातावरण असल्याचे दिसत नाही. त्यामुळे मतदारच नक्की विधानसभा निवडणूक आहे ना असा सवाल करताना दिसत आहेत.

उरण विधानसभेसाठी उरण परिसरातील उमेदवार असताना व त्यांचे कार्यालय उरण शहरात असतानाही कार्यालयात गर्दी नसते, तसेच जे कार्यकर्ते असतात तेही उत्साही असल्याचे दिसत नाही. उमेदवार अथवा पक्षाचे पदाधिकारी याबाबत पत्रकारांनी विचारणा करूनही ते याबाबत कोणतीच माहिती देताना दिसत नाही. मतदानासाठी आता ७ ते ८ दिवसांचा अवधी उलटूनही उरण परिसरातील राजकीय वातावरण थंड असल्याने मतदार ही आपल्या नेहमीप्रमाणे वावरताना दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!