• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण कोणाच्या पारड्यात जाणार?

ByEditor

Nov 12, 2024
उरणमध्ये मतदारांचा आकडा
पुरुष … एक लाख 68 हजार 712 मतदार महिला … एक लाख 67 हजार 501 तृतीयपंथी … 12 एकूण … तीन लाख 36 हजार 22542 हजार मतदार वाढले2019च्या निवडणुकीत दोन लाख 94 हजार 194 मतदार होते. जनजागृती आणि नवमतदारांच्या नोंदणीनंतर 2024मध्ये 42 हजार 31 मतदार वाढले आहेत. वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार, यावर पुढचा आमदार ठरणार…

घनःश्याम कडू
उरण : उरण विधानसभेचा अर्धा भाग असलेला खालापूर तालुक्यातील वासांबे, वडगाव आणि चौक जिल्हा परिषद गट मतदारसंघासाठी निर्णायक ठरत आहे. 2019 मध्ये अपक्ष असलेले महेश बालदी यांना आमदारकीच्या खुर्चीत बसवले होते. यंदा बालदी महायुतीत असून भाजपमधून निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर व शेकापचे प्रितम म्हात्रे हे रिंगणात आहेत. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

2009 मध्ये उरण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून झालेल्या तीनही निवडणुकीत इथल्या मतदारांनी वेगवेगळा कौल दिला आहे. 2009 ला शेकापचे विवेक पाटील, 2014 ला शिवसेनेचे मनोहर भोईर आणि 2019 च्या निवडणुकीत भाजप बंडखोर अपक्ष लढलेले महेश बालदी यांना जनतेने निवडून दिले आहे. 2014 च्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांचा अवघ्या 811मताने निसटता पराभवपासून शेकापला उतरती कळा लागली आहे. त्यानंतर कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणामुळे विवेक पाटील यांना झालेला तुरुंगवास यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात शेकापला वाली नसल्याचे स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा फायदा आमदार महेश बालदी यांनी पुरेपूर उचलला असून भाजप मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मनोहर भोईर यांना 2019 मध्ये महेश बालदी यांनी 5710 मतांनी पराभूत केले होते. महेश बालदी यांना वासांबे, वडगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत झाली होती. त्यामुळे त्यांना विजयाची चव चाखता आली होती. 2024 निवडणुकीत बालदी भाजपकडून अधिकृत उमेदवार असून, मनोहर भोईर हे ठाकरे गटाकडून त्यांच्याविरोधात लढत देत आहेत. शेतकरी कामगार पक्ष अस्तित्व दाखवण्यासाठी प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, शेकापचा घटलेला जनाधार यामुळे त्यांचा निभाव लागणे कठीण आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शेकाप किती शिल्लक आहे, याचा अंदाज या निवडणुकीनिमित्ताने येणार आहे.

2019ला पराभूत होऊनही ठाकरे गटाचे भोईर यांनी मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क यामुळे बालदी यांना निवडणूक सोपी जाणार नाही. बालदी महायुतीत असून, यावेळी अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यासोबत आहे. वासांबे, वडगाव, जिल्हा परिषद गटातून येथील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप मुंडे आणि सुरेश पाटील यांची मोलाची मदत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहरशेठ भोईर हे राजकीय डावपेज वापरण्यातयशस्वी ठरले, तर उरण विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडू शकेल. उरण मतदारसंघातून शेकापकडून प्रीतम म्हात्रे जरी निवडणूक रिंगणात असले, तरी मुख्य लढाईत निभाव लागणे कठीण आहे, असे बोलले जात आहे. म्हात्रे केवळ वर्षभरापूर्वी सक्रिय झाल्याने शेकापला उरण विधानसभा मतदारसंघात आपले मतदार चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेकापला उमेदवार उभे करताना होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!