• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोटारसायकल व दोन कारमध्ये अपघात; ३ जण जखमी

ByEditor

Nov 18, 2024

सलीम शेख
माणगांव :
मोटारसायकल व दोन कारमध्ये विचित्र अपघात होऊन ३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १६ नोव्हेंबर रोजी दु. २ वा. च्या सुमारास जखमी सचिनकुमार राऊत हे त्यांची पत्नी वेदीका व मुलगी रित्वी यांच्यासह माणगाव येथे त्यांचा ताब्यातील मोटारसायकल एमएच १५ एफई ६३२४ ही स्वतः चालवत घेवुन जात असताना मौजे मोर्बा घाटात वळणवर माणगाव म्हसळा रोडवर आल्यावेळी समारुन येणारी कार क्र. एमएच ०२ डीएन ३२९५ वरील चालक आयुब युसुफ शरिफ (वय ३५ वर्षे, रा. मुंबई) याने अतीवेगाने हयगयीने बेदारकारपणे रस्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन मोटारसायकलला ठोकर मारुन अपघात झाल्याने मोटारसायकल ही मागुन येणाऱ्या कार क्र. एमएच १२ एमबी ६१५६ हीस धडकली. या अपघातात आरोपी व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांना किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या दुखापती व तिन्ही गाडयांचे नुकसान झाले आहे.

या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. गणेश समेळ करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!