मुलीच्या कामगिरीने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील काळेश्री गावाची सुकन्या कु. स्वरा पाटील हिने रशिया येथे झालेल्या जागतिक किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, जागतिक युनिव्हर्सल कॉम्बॅट चॅम्पियनशिप २०२४ मध्ये प्रथम येऊन सुवर्ण पदक मिळविले असून चॅम्पियन बेल्टवर आपले नांव कोरले आहे.
शहरातील कोनाएन्सेस स्कूलमधील १७ वर्षे वयोगटा खालील असणारी काळेश्री गावातील कु. स्वरा नेहा राजेश पाटील हिने महाराष्ट्रासह भारत देशाचे प्रतिनिधित्व केले असून जागतीक किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, जागतिक युनिव्हर्सल कॉम्बॅट चॅम्पियनशिप २०२४ मधील स्पर्धेत प्रथम स्थानावर मजल मारून “सुवर्ण पदक” व “चॅम्पियन बेल्ट” वर आपले नाव कोरल्याने तीने आपल्या गावासह महाराष्ट्र व भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर नेल्याबद्दल कु. स्वरा पाटील हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या मुलीने जागतिक पातळीवर यश प्राप्त केल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.