एकाच कुटुंबातील ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वार्ताहर
पनवेल : राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला जात असताना पनवेलमधून धक्कादायक घटना उघडकीस आली. पनवेल येथील एका २४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखळ करण्यात आला, अशी माहिती पनवेल पोलिसांनी शुक्रवारी (२२ नोव्हेंबर २०२४) दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील वावंजे गावातील रहिवासी असलेल्या पुरुषाने पीडित महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने ऑक्टोबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पीडितावर अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने जातीचे कारण देत पीडितेला लग्नास नकार दिला आणि तिचा अपमान केला. यानंतर पीडिताने जवळच्या पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.