• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वेश्वी गावात घरफोड्या; २५ लाखाचा ऐवज लंपास

ByEditor

Nov 29, 2024

चड्डी-बनियान गँगमुळे रहिवासी भयभीत

अनंत नारंगीकर
उरण :
थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात चोरट्यांनी शिरकाव केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत गुरुवारी (दि. २८) अज्ञात चोरट्यांनी वेश्वी गावातील चार रहिवाशांच्या घरातील बंद दरवाजाच्या कडी, खिडकी तोडत आत प्रवेश करुन कपाटातील अंदाजे सुमारे २५ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घर मालकांनी याबाबत पोलिसांना फोन करुन माहिती दिली.

मागील वर्षी उरण तालुक्यात घरफोड्यांच्या घटनांत वाढ झाली होती. यावेळी पोलीस यंत्रणेला सहकार्य म्हणून रहिवाशांनी ‘जागते रहो’ चा नारा दिला होता. तसेच काही संतप्त रहिवाशांनी चोरीच्या कामासाठी वापरण्यात येणारी गाडीही जाळून टाकल्याची घटना घडली होती. त्यावेळी चोरट्यांनी अंधाराचा फायदा उठवत पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले होते. त्या घटनेला आज एक वर्षाचा कालावधी लोटतो तोच पुन्हा वाढत्या थंडीचा फायदा उठवत चड्डी-बनियान गँगनी आपला मोर्चा हा उरण तालुक्याकडे वळविला आहे. गुरुवारी (दि. २८) चड्डी-बनियान गँगच्या चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत वेश्वी गावातील प्रभाकर पाटील, शशिकांत मुंबईकर, हसुराम मुंबईकर, राज, सागर मुंबईकर या चार रहिवाशांच्या बंद घरातील दरवाजाच्या कडी तसेच खिडकी तोडत घरात प्रवेश करुन कपाटातील अंदाजे २५ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सदर चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

वेश्र्वी गावातील रहिवाशांच्या निदर्शनास चोरीच्या घटना येताच रहिवाशांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र पुन्हा एकदा चोरट्यांनी उरण तालुक्यात शिरकाव केल्याने उरण तालुक्यात खळबळ उडाली असून रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!