• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गॅस दुरुस्तीचे काम करताना उडाला आगीचा भडका! तिघे गंभीर जखमी

ByEditor

Dec 9, 2024

प्रतिनिधी
नागोठणे :
घरगुती गॅस दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने तिघेजण भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना नागोठणे शहरातील खडक आळीत घडली आहे. या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून रविवार, दि. 8 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

नागोठणे शहरात खडक आळी येथे राहणारे विलास जोशी यांच्या घरी गॅस दुरुस्तीचे काम करण्यासाठी येथील आंगर आळीतील योगेश ठमके हे गेले होते. गॅस दुरुस्त करीत असताना आगीचा अचानक भडका उडाल्याने या आगीत विलास जोशी (45), दिनेश म्हाप्रळकर (17) व योगेश ठमके (48) हे तिघेजण जखमी झाले. जखमींवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. आगीत गंभीर जखमी झालेल्या योगेश याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत जोशी यांच्या घरातील सामान तसेच मंडप डेकोरेशनचे साहित्य खाक झाले असून अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दया पाटील या तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!