सलीम शेख
माणगाव : माणगाव शहरातील मौजे खांदाड येथील इमारतीच्या टेरेसवरून दारूच्या नशेत खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मयत रंजित मुन्नू भारती (वय ३५, मूळ रा. राघेपटह, जि. गोरखपूर) हा दारू पिऊन दारुच्या नशेत खांदाड येथील इमारतीच्या टेरेसवर फोनवर बोलत असताना त्याचा तोल जाऊन तो टेरेसवरुन बिल्डिंगचे खाली उभ्या असलेल्या स्कुल बसचे टपावर पडला. त्यास उपचाराकरिता दि. ११ डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले असता तेथिल डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.