• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यात चक्री जुगाराचे डाव रंगू लागले!

ByEditor

Dec 12, 2024

घन:श्याम कडू
उरण :
तालुक्यात यात्रा व क्रिकेट व इतर खेळांचा हंगाम सुरू झाल्याने चक्री जुगाराचे डाव रंगण्याची शक्यता आहे, तरी या चक्रीच्या जुगारांना पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

उरण तालुक्यातील गावोगावच्या यात्रांचा हंगाम सुरू होणार आहे. त्याच बरोबर नाईट क्रिकेट व इतर खेळांचे सामनेही मोठ्या प्रमाणात तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी संपन्न होताना दिसतात. यावेळी चक्रीच्या जुगाराचा डाव मोठया प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

दोन दिवसांवर उरण शहरातील दत्त जयंतीची यात्रा संपन्न होणार आहे. यावेळी शहरातील काही ठिकाणी चक्री जुगाराचा डाव रंगणार आहे. त्यानंतर यात्रा व क्रिकेट सामने सुरू होतील. त्यावेळीही चक्रीचा जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असतो. सदर चक्रीचा जुगार हा रात्रीच्या वेळेस कुठल्या तरी कोपऱ्यात सुरू असतो. त्यावेळी चक्री जुगारवाले आम्हांला परवानगी दिली असल्याचे खोटेनाटे सांगून वेळ मारून नेतात. तरी उरणमधील तीनही पोलीस ठाण्याने अशा चक्री जुगारांना परवानगी देऊ नये अशी मागणी महिला वर्गाने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!