• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नॅशनल हायवेकडून तात्काळ स्पीडब्रेकर निर्मिती, बंडू खंडागळे यांच्या मागणीला यश

ByEditor

Dec 13, 2024

विनायक पाटील
पेण :
पेण आंबेगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून नव्याने लोकवस्ती, नागरिकरण फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यातच पेण खोपोली रोडवर आंबेघर ग्रामपंचायत हद्दीत नव्याने अनेक व्यवसायिक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय त्याचबरोबर हॉटेल्स निर्मिती करीत असल्याने पेणमधील अनेक नागरिक आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनुसार जेवण अथवा नाश्ता करण्यासाठी आंबेघर येथील हॉटेलमध्ये येत असतात. यामध्ये विश्रांती हॉटेलजवळ नुकताच ९ डिसेंबर २०२४ रोजी एक मोटरसायकलचा फार मोठा अपघात झाला. तसेच याआधी सुद्धा अनेक अपघात या भागात झाले असून जीवितहानी देखील झाली आहे.

या अनुषंगाने रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा माजी चिटणीस, भाजपा सदस्य तसेच माहितीचा अधिकार पोलीस संरक्षण समिती रायगड जिल्हा संघटक बंडू खंडागळे यांनी तात्काळ नॅशनल हायवेचे उप अभियंता रवींद्र कदम यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी लगेच याबाबत कारवाई करून तात्काळ विश्रांती हॉटेल येथे सिद्धांत रेसिडेन्सीकडे जाताना त्याचबरोबर विश्रांती हॉटेलच्या पुढे खोपोली बाजूस आणि पेण बाजूस तीन नव्याने गतिरोधक बनवले आहेत. या गतिरोधकाच्या माध्यमातून पुढील काळात होणारे अपघात टाळले जातील. नॅशनल हायवेचे अधिकारी रवींद्र कदम यांनी केलेल्या तात्काळ सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आंबेघर परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांनी देखील या नव्याने झालेल्या स्पीड ब्रेकरमुळे समाधान व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!