• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरातील ‘ती’ टपरी अनधिकृत?

ByEditor

Dec 17, 2024

टपरी धारकाकडे अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड

घन:श्याम कडू
उरण :
शहरातील वीर सावरकर मैदानासमोरील सह्याद्री बार जवळील गल्लीमध्ये असलेल्या पान टपरी धारकाकडे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे मागितली असता ती अद्याप न दिल्याने ती अधिकृत नसल्याचे बोलले जात आहे.

सदर टपरी धारकाने दुरुस्तीची कोणतीही परवानगी न घेता दुरुस्ती सुरू केली होती. याबाबत जागरूक नागरिकांनी याची तक्रार नगरपालिका कर्मचाऱ्यांकडे केली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता संशयास्पद आढळल्याने टपरी धारकास अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. याची माहिती टपरी धारकाने मालकाला देत त्यांनीही आपण पेपर देतो असे सांगितले. त्याला आज सात आठ दिवस उलटूनही वारंवार कल्पना देऊनही कोणतेही पेपर टपरी धारक अथवा मालकाकडून देण्यात आलेले नाहीत. यामुळे सदरचे बांधकाम अथवा टपरी अनधिकृत असल्याचा संशय बळावला असल्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. तरी सदरची टपरी अनधिकृत असल्यास ती त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!