प्रतिनिधी
नागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन वेलशेत ता. रोहा येथे गुरूवार, दि. १९ डिसेंबर २०२४ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीराचे उद्घाटन महाविद्यालय विकास समिती सदस्य नरेंद्र जैन यांच्या हस्ते सांयकाळी ३.३५ वा. संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोहा येथील डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश भगत भुषविणार आहेत.
सात दिवस आयोजित श्रमसंस्कार शिबीरात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान, बंधारा, क्रिडा स्पर्धा, महिला मेळावा, बुवाबाजी प्रयोग, पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ७ दिवसात विविध विषयांवर मान्यवर तज्ञ अभ्यासकांचे व्याख्याने आयोजित केली आहेत. शेवटच्या दिवशी सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांवर पथनाट्य सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या श्रमसंस्कार शिबीराचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व प्रा. डॉ. मनोहर शिरसाठ मेहनत घेत आहेत.