• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण पोलीसांनी गोमांस वाहतुक करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद

ByEditor

Dec 24, 2024

विनायक पाटील
पेण :
येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३२४/२०२४ भा.न्या.सं.कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ५(अ), ५ (क), ९, ९ (अ) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलीम १९२ (अ) हा गुन्हा दिनांक १५/१२/२०२४ रोजी १७.३० वाजता दाखल होता. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तसेच उप विभागीय पोलीस गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पेण पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक समद बेग तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार या गुन्ह्याचा तपास करीत होते.

सदर गुन्ह्यातील टेम्पो क्रमांक एमएच ०५/एफ जे १५११ मध्ये ६,९८,०००/- रूपये किंमतीचे ३४९० किलोग्रॅम वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस मिळुन आल्याने ते वरिष्ठांच्या आदेशान्वये नाश करण्यात आले. तसेच ३ लाख रूपये किंमतीचा टेम्पो क्रमांक एमएच ०५/एफ जे १५११ जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना टेम्पो क्रमांक एमएच ०५/ एफ जे १५११ चे मालक साजीद लायक कुरेशी (रा. रसुल बिल्डींग, कुरेशीनगर, कुर्ला पुर्व, मुंबई) असे असल्याचे समजले. गुन्ह्यातील आरोपीत १) अफसर मेहबुब कुरेशी (वय – ३९ वर्ष, रा. रूम नं. ५, कुरेशीनगर, कब्रस्तान रोड, रज्जब शेठ चाळ, कुर्ला पुर्व, मुंबई), २) नजरूद्दिन निजामुद्दिन खान (वय – ४८ वर्ष, रा.रूम नं.११, अब्बास शेठ चाळ, कुरेशी नगर, कब्रस्तान रोड, कुर्ला पुर्व, मुंबई), ३) साजीद लायक कुरेशी (वय–४३ वर्ष, रा.रूम नं. १२,१३, बिल्डींग नं. ३९, गुलाम रसुल चाळ, कुरेशीनगर, कुर्ला पुर्व मुंबई) यांची माहिती घेऊन चौकशीअंती त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री झाल्यावर त्यांना दिनांक १९/१२/२०२४ रोजी अटक करण्यात आली असुन त्यांची दिनांक २६/१२/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे. गुन्ह्यातील इतर आरोपीत यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पेण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोसई समद बेग व सहा. फौजदारराजेश पाटील, पोह राजेंद्र भोनकर, संतोष जाधव, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सुशांत भोईर, सचिन व्हसकोटी, पोलीस नाईक अमोल म्हात्रे व पोलीस शिपाई गोविंद तलवारे हे काम करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!