प्रतिनिधी
रायगड : जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता दि. 26, 27, 28 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये मेडिसीन विभाग – उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तपासणी व उपचार, हृदयरोग – गरजेनुसार 2D ECHO, X -ray, USG, ECG (stemi), डोळ्यांची तपासणी – डोळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप, मोफत चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी – महिलांचे आजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोग तपासणी, नाक, कान, घसा तपासणी – ENT तपासणी व शस्त्रक्रिया, गरजेनुसार एन्डोस्कोपीद्वारे कानाची श्रवण वाटप, ऑर्थोपेडिक – चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपी सुविधा, दंत विभाग – मुख आरोग्य तपासणी, दातांचे आजार, कवळी बसवणे, सर्जरी – हर्निया, हायड्रोसिल तपासणी व शस्त्रक्रिया, मानसिक – मानसिक आजार तपासणी, उपचार व तपासणी, आयुष-पंचकर्म, आयुर्वेद उपचार, समुपदेशन व मोफत आभाकार्ड काढून दिले जाईल. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील.